लग्नात नववधूची गाडीतून Grand Entry ठरली जीवघेणी... असा प्रकार नकोच
यूपीच्या मुजफरनगर भागात अशीच एक घटना घडली आहे, जी घटना तुम्ही तुमचा श्वास रोखून पाहाल.
लखनऊ : लग्न ही एक अशी गोष्ट आहे, जो प्रत्येक नववधूसाठी महत्वाचा क्षण असतो, कारण त्या दिवसापासून ते दोघेही आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार असतात. म्हणून त्यांना नेहमी असं वाटत असतं की, आपल्या लग्नाचा दिवस काहीतरी वेगळा असावा, ज्यामुळे तो सगळ्यांच्याच लक्षात राहिल आणि सगळी लग्नाला उपस्थित सगळी मंडळी या लग्नाबद्दल चर्चा करतील. एका लग्नात अशीच एक घटना घडली आहे जी, लग्नात उपस्थीत लोकंच काय तर सोशल मीडियावर पाहिलेल्यांपैकी कोणीही विसरणार नाही.
परंतु हा व्हिडीओ काही सुखांच्या क्षणांचा नाही. हा तर दुखं व्यक्त करणारा आणि थराराक व्हिडीओ आहे, जो पाहून सगळ्यांनी यातून काही शिकलं पाहिजे आणि लोकांनी अशी गोष्ट तरण्यापूर्वी स्वत:च्या जिवाची काळजी घेतली पाहीजे.
यूपीच्या मुजफरनगर भागात अशीच एक घटना घडली आहे, जी घटना तुम्ही तुमचा श्वास रोखून पाहाल आणि हा क्षण कदाचित तुमच्या डोळ्यासमोरुन देखील जाणार नाही. येथे एक नववधू रुफ टॉप कारमध्ये वरचं रुफ उघडं करुन उभी आहे आणि तिच्या वरातीत नाचत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. तर इतर कुटूंबातील सदरस्य कारच्या आजू-बाजूला वरातीतल नाचत आहेत. परंतु त्यादरम्यान एक भयानक अपघात घडतो, ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती.
बुधवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
या अपघातात वराचा चुलत भाऊ प्रमोद कुमार (४२) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यातील काहींनानंतर मेरठमधील दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.
वर अंकुल कुमार म्हणाला: “आम्ही पार्किंगजवळ उभे होतो. वधूची कार बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करणार असताना एका भरधाव कारने लोकांना धडक दिली ज्यात माझा चुलत भाऊ मरण पावला आणि अनेक गंभीर जखमी झाले.”
नवीन मंडी पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अनिल काप्रवान म्हणाले: “ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर धडक दिलेली कार जप्त करण्यात आली आहे. आम्ही ड्रायव्हरचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत."
ही अशी घटना आहे, ज्यामध्ये तसे पाहाता या वरातीत उपस्थीत लोकांची चूक नव्हती, त्या भरधाव कारने त्यांना टक्कर दिली आहे, परंतु मेन हायवे दरम्यान किंवा जिथे भरधाव वाहने असताता अशा ठिकाणी शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात जेणेकरुन अशी जिवीतहानी होणार नाही.