नवरीने नवरदेवासोबत असं काही केलं की फोटोग्राफरलाही बलसा मोठा धक्का
पाहा भन्नाट व्हिडिओ
मुंबई : सध्या सर्वत्र लग्न सराईचं वातावरण आहे. त्यामुळे लग्न क्रर्यक्रमातील किंवा लग्नाअधीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्न कार्यक्रमात प्रत्येक जण फोटोग्राफर तर ठेवतोचं. त्यामुळे सगळ्यांना अपेक्षा असते आपले फोटो सुंदरचं येतील. अनेक वेळा फोटोग्राफर्सकडून काही चूका होतात. पण याठिकाणी तर चक्क नवरीकडून चूक झाली आहे.
व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी लोकेशनवर फोटोशूट करताना दिसत आहे. एका छोट्या ठिकाणी पाणी साचलेल्या ठिकाणी फोटो काढण्याचा कर्यक्रम सुरू होता. तेव्हा फोटोग्राफर नवरदेवाला पोज दाखवण्यासाठी आला. फोटोग्राफर नवऱ्याला पकडून पोज दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
तेव्हा नवरीने जे केलं त्यावर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. नवरीने मस्करीमध्ये नवरदेव आणि फोटोग्राफरला खाली पाण्यात ढकलून दिलं. सध्या हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आह.