गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू; लग्न मडंपातून वराती ऐवजी निघाली प्रेतयात्रा
लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका लग्न सोहळ्यात धक्कादायक घडली आहे. नवरदेवाने गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू झाला आहे. लग्न मडंपातून वराती ऐवजी नवरीची प्रेतयात्रा निघाली.
Shocking News, लखनऊ : लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. उत्तर प्रदेशातील लखनऊ(Lucknow) येथे एका लग्न सोहळ्यात धक्कादायक घडली आहे. नवरदेवाने गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू झाला आहे. लग्न मडंपातून वराती ऐवजी नवरीची प्रेतयात्रा निघाली. या घटनेमुळे एका क्षणात होत्याच नव्हत झाल. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे(Shocking News).
लखनऊच्या भदवाना येथे हा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. शिवांगी असे मृत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तिचे लग्न होते. लग्नाच्या विधी सुरु झाल्या. नवरदेवाने शिवांगीच्या गळ्यात वरमाला घालताच ती अचानक स्टेजवरच कोसळली.
यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. शिवांगी बेशुद्ध झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषात केले. हृदयविकाराच्या झटक्याने शिवांगीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मागील 15-20 दिवसांपासून शिवांगीची तब्येत ठीक नव्हती. तिला ताप आला होता. शिवांगीला बीपीचा देखील त्रास होत होता. तिचा बीपी कमी जास्त होत होता. मलिहाबाद सीएचसीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर तिला घरी सोडण्यात आले. लग्नाची खूप दगदग झाव्याने तिला थकवा आला होता. अखेर लग्नाच्या दिवशीच शिवांगीचा मृत्यू झाला आहे.
शिवांगीच्या मृत्यूमुळे अवघ्या काही मिनिटांत सर्व आनंदाचे रूपांतर शोकात परावर्तित झाले. शिवांगीच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.