मुंबई: पाणीपुरी कोणाला आवडत नाही. नुसतं नाव जरी काढलं तरी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला नुसत्या नावानं पाणी सुटतं. त्यात जे पाणीपुरीसाठी वेडे असतात त्यांची गोष्टच वेळगी आहे. पाणीपुरीसाठी चक्क नववधून मंडप सोडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चोरून पाणीपुरी खाण्यासाठी लग्न सोडून वधूनं काढता पाय घेतला. ती थेट पाणीपुरीच्या इथे पोहोचली आणि पाणीपुरी खायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या मंडपातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडीओ खास चर्चेत आला तो नववधूमुळे. लग्नाचे विधी सोडून नववधून थेट पाणीपुरी खायला पळून गेली. यावर ती पाणीपुरी लव्हर असल्याचं दिसत आहे. नववधू पाणीपुरी खाताना कॅमेऱ्यात कैद झाली आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा कॅमेरामन तिच्यापर्यंत पोहोचला तेव्हा तिने आपल्या तोंडात पाणीपुरीची पुरी कोंबली आणि तिथून पळ काढला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओनं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. लग्नातील हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



बॉलिवूड शादी नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो लोकांना खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'असे काहीतरी मला माझ्या लग्नात एन्जॉय करायचं आहे'. वधू -वरांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.