मुंबई : सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे काही व्हिडीओ आहेत जे खूपच मजेदार आहेत, परंतु काही असे आहेत की जे पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसतो.पूर्वीच्या लग्नांमध्ये, बहुतेक नववधू स्टेजवर शांतपणे बसलेल्या पाहायचो, परंतु आजच्या युगात, वधू वरांपेक्षा जास्त सक्रिय असतात आणि प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभाग घेतात. वधू आणि वर त्यांच्या लग्नाला खास बनवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. पण लग्न घरात काही विचित्र गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामुळे काही काळासाठीची मजाच बिघडते. मग ते नातेवाइकांमधील भांडण असो किंवा वधू-वरांमधील कोलाहल असो. जे पाहून तुम्हाला कधीतरी आश्चर्य वाटलेच पाहिजे आणि कधी कधी तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाही. सध्या पुन्हा एकदा एका लग्नाशी संबंधित एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. जे लोकांना हसवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ पाहून समजते की लग्नाशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या विधी झाल्या आहेत. आता वधू आणि वर एकमेकांच्या समोर बसले आहेत आणि सगळे विधी सुरु आहेत. त्यानंतर अचानक वर उठतो आणि समोर बसलेल्या वधुला जवळ घेतो आणि तिला किस घेतो. त्यानंतर ते दोघे त्याच गुंततात आणि नंतर नातेवाईकांनामध्ये येऊन त्यांना थांबवावे लागते. तिथे उपस्थित असलेले पाहुणेही हसणे थांबवू शकत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वधू-वरांच्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. लोक व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पाठवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता पर्यंत लाखो लोकांना हा पाहिला आहे. हा जुना व्हिडीओ असला तरी चर्चेचा विषय ठरतोय.