लग्नमंडपात वधूसोबत मस्करी करणं पडलं महागात, घडवली अशी अद्दल की पाहातच राहिला `वर`
लग्नमंडपात अशी मजा कधीही करू नका, नाहीतर तुमच्यासोबतही असं होऊ शकतं, पाहा व्हिडीओ
मुंबई: लग्नाच्या मंडपात अनेक गमतीजमतीचे किस्से होत असतात. नवरदेव आणि वधूसोबत मित्रमंडळ अनेक गमतीजमती करत असतात. मात्र लग्नाच्या मंडपात नवरदेवाला मजा करणं चांगलंच महागात पडलं आहे. भरमंडपात नवरीनं असं काही केलं की नवरदेवाच्या मित्रांनी केलेली मस्ती त्याच्या चांगलीच अंगाशी आल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवदेवाला वरमाला गळ्यात घालण्याआधी मित्रांनी त्याला हाताने वर उचललं त्यामुळे वधूला गळ्यात वरमाला घालता आली नाही. तिने त्याला खाली उतरायला सांगितलं. मात्र मित्रांनी काही सोडलं नाही. अखेर नववधू तिथून बाजूला निघून गेली. तिने वरमाला घातली नाहीच उलट ती बाजूला निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नववधू सोफ्यावर जाऊन आरामात बसली. तिला या गमतीजमतीचा काहीच फरक पडला नाही असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत.
नववधूने नवरदेवाला खाली उतरवण्याची वाट पाहिली. तो खाली उतरल्यानंतरच त्याच्या गळ्यात वरमाला घालून उरलेल्या विधी पूर्ण केल्या. आतापर्यंत हा व्हिडीओ 2 लाख 80 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.