मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक लोकांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या लग्नाचा सिझन असल्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर आपल्याला लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सगळ्यांनाच आश्चर्यचकित करत आहे. हा व्हिडीओ एका नववधूचा आहे. ज्यामध्ये लग्नापूर्वी तिने आपल्या नवऱ्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट करत असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर, तुम्ही तुमच्या बऱ्याच लोकांना पश्चात्ताप करताना ऐकले असेल, त्यांच्या जोडीदाराच्या कृत्याचा अनेकदा त्यांना राग येतो, ज्यामुळे त्यांच्यात भांडणं देखील होतात. 


त्यामुळे असे होऊ नये म्हणून एका नववधूने युक्ती काढली आणि तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक करार करण्याचे ठरवले. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नववधू हातात एक एग्रीमेंट घेऊन बसली आहे. त्यामध्ये काय लिहिलं आहे आणि तो एग्रीमेंट कशा सबंधात आहे हे ती सांगत आहे.


जेव्हा नववधूला तुझ्या हातात काय आहे असे विचारले असता. 'ती म्हणाले की यामध्ये एक एग्रीमेंट आहे, ज्यावर मी माझ्या नवऱ्याची सही घेणार आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वधू पुढे म्हणते की, जो कोणी वेब सिरीज पहिला पाहिल त्याने त्यासंदर्भातील माहिती किंवा स्टोरी, दुसऱ्याला सांगू नये. तसेच नवरा तिला दिवसातुन तीन वेळा आय लव्ह यू म्हणेल. तसेच तिच्याशिवाय तो कधीही बार्बिक्यू खाणार नाही. तसेच मी जेव्हा काही विचारेल तेव्हा तु माझी शपथ घेऊन मला खरं सांगशिल. नववधूच्या अशा आगळ्यावेगळ्या कृत्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.