Viral News : आपण पाहिलं असेल की काही लग्न मंडप सजलेला असताना काहीतरी घडतं अन् त्याच क्षणी मोडली जातात. काहीवेळा हुंडा किंवा काही किरकोळ कारणावरूनही संपूर्ण तयारी झालेली असलेली लग्न पूर्ण होत नाहीत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये नववधूने वराचा हात पाहिला आणि हे लग्न मंजूर नसल्याचं सांगितलं. नववधूचं हे बोलणं एकूण सर्वांना धक्काच बसतो. (bride refused to nikah with groom for his hand issue read shocking story Marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?
बिहारमधील बक्सर ही घटना असून कुकुधा, इटडी येथे राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न ठरलेलं असतं. लग्नाच्या तारखेच्या दिवशी तो नवरीच्या घरी म्हणजेच कुकुधाहून गाझीपूरमधील कासीमाबादला वरात घेऊन जातो. तिथे गेल्यावर नवरदेवाचं जंगी स्वागत केलं जातं.


काही वेळानंतर सर्व विधी उरकले जातात, आता फक्त नवरा आणि नवरीचा कबुलीजबाब बाकी असतो. दोघेही येतात आणि कबुलीजबाबचा विधी सुरू होतो यादरम्यान नवरदेवाच्या हाताकडे वधूची नजर जाते. त्याचक्षणी ती ताडकन उठते अन् लग्न करायचं नसून हा विवाह आपल्याला मान्य नसल्याचं सांगते. 


नवरदेव मुलाचा एका हातात जन्मजात समस्या असते, मात्र याबाबत तिला काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे ती ज्यावेळी तिच्या डोळ्यांनी पाहेत त्याचक्षणी लग्न न करण्याचा निर्णय घेते. कारण नवरदेव मुलगा हातात अपंग असतो, इतके सारे नातेवाईक जमले आहेत आता कसं काय बोलायचं असा कोणताही विचार न करता ती विवाह न करण्याचा निर्णय घेते.