Bride LED Dress Video: हल्ली लग्नाचे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यातून असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर फक्त त्यांची चर्चा रंगलेली दिसते. लग्नाच्या व्हिडीओमध्ये कोण कधी काय क्लृप्त्या करेल याचा काहीच नेम नाही. अशाच एका लग्नात नवऱ्या मुलीनं स्वत:ला अगदी एलईडी लाईटप्रमाणे सजवले होतं. लग्नात सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे नवरी मुलीच्या दागिन्यांची किंवा तिच्या सुंदर कपड्यांची. परंतु यावेळी चर्चा होती ती म्हणजे या नवऱ्या मुलीनं अंगावर घातलेल्या एलईडी लाईट्सची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिची सोशल मीडियावरून चांगलीच चर्चा रंगेलली होती. सध्या हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. यावेळी खासकरून या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळाली होती. परंतु तुम्ही म्हणाल की नक्की याचे प्रयोजन काय होते? तेव्हा या लेखातून ते सविस्तरपणे जाणून घेऊया. लग्नात महागडे दागिने घातल्यावर अनेकांचे लक्ष वळते. आता नवऱ्या मुलीनं लग्नात हे कपडे परिधान केल्यानं सर्वत्र तिचीच चर्चा रंगलेली आहे. 


हेही वाचा : उतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स


यावेळी @rehabmaqsood यांनी इन्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या म्हणतात की, ''हा माझ्या मेहेंदीचा व्हिडीओ आहे. हा माझा पोशाख माझ्या सुपर डुपर पतीनं केला आहे. ज्याला नेहमी असं वाटायचं की त्याची नवरी ही या खास दिवशी फक्त चमकत राहिली पाहिजे. मला अनेकांनी असं सांगितले की लोकं काय म्हणतील परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी अभिमानानं हा ड्रेस घातला होता. कारण मला माहिती आहे की कोणत्याही माणसाला हेच वाटतं की त्याची नवरी मुलगी ही सतत जमकतच राहावी.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी त्यांच्या या व्हिडीओलाही नेटकऱ्यांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओची चर्चा आहे. हा व्हिडीओ 7 दिवसांपुर्वी शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला 2.5 लाख व्हूजस मिळाले आहेत. त्यामुळे या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे. तर 3000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावेळी नेटकऱ्यांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हणलं, ही रणवीरची बहीण का, तर दुसऱ्यानं म्हटलं, इलेक्ट्रीक इंजिनियरचं लग्न झालं. तर तिसऱ्यानं लिहिलंय, परत एवढी मेहनत घेऊ नकोस, तर एकानं लिहिलंय की, अशा फालतू गोष्टींवर खर्च करण्यासाठी यांच्याकडे बरा पैसा असतो.