चालता चालता अचानक मृत्यूनं गाठलं, पाहा या लोकांसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ
मृत्यूचा LIVE थरार कॅमेऱ्यात कैद, हा व्हिडीओ पाहून तुमचंही मन हेलावून जाईल
नवी दिल्ली : आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. कधी सोशल मीडियावर तर कधी डोळ्या देखील अपघात झाल्याचे पाहिलं असेल. रस्ते वाहून गेल्याचा पूल कोसळल्याचे किंवा रस्ते अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक मन सुन्न करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुलावरून चालणाऱ्या लोकांना मृत्यूनं गाठल्याचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता लोक पुलावरून ये जा करत आहेत. यामध्ये एक लहान मुलगा देखील आहे. पुलावरून जात असताना अचानक पूल कोसळतो. लहान मुलगा पाण्यात वाहून जातो.
हा संपूर्ण प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ कुठल्या भागातला आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. एका युझरने आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.