जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. भारतीय जवानांनी हिज्बुल कमांडर रियाज नायकूचा खात्मा केला आहे. रियाक नायकूवर १२ लाख रूपयांचं बक्षिस होतं. या आधी पुलवामाच्या अवंतीपोराच्या दक्षिण भागात भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमकीत ३ अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कराने अवंतीपोर आणि पंपोरला घेरलं आहे, यात आणखी अतिरेकी लपून बसले असण्याची शक्यता आहे. फायरिंग अजूनही या भागात सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने 50RR, CRPF ची 185BN आणि पोलिसांनी संयुक्तपणे ख्रू पनपोरच्या शरशाली भागाला घेरलं आहे. यात जवानांनी झाडाझडती सुरू केली आहे, या चौकशीत अतिरेकी आणि जवानांची चकमक झाली आहे. 


भारतीय सैनिकांनी चारही बाजूंनी हा भाग घेरला आहे आणि त्या भागात चौकशी सुरू केली आहे.


अवंतीपोरा आणि बेगपोरा भागातील सर्च ऑपरेशन दरम्यान ही ४ दिवसातील ५ वी चकमक आहे. तिकडे बालाकोटमध्ये पाकिस्तानने सीझ फायर केलं आहे. 


सीमेपलीकडून होत असलेल्या गोळीबाराला यापूर्वीच भारताने कठोर कारवाईने उत्तर दिलं आहे.


जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये शनिवारी भारतीय जवानांशी अतिरेक्यांची चकमक झाली होती, यात दोन अतिरेकी मारले गेले होते. 


या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ मेजर आणि १ कर्नल असे अधिकारी शहीद झाले होते. यानंतर हंदवाडात सीआरपीएफच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला झाला  होता. यात ३ जवान शहीद झाले होते.