जम्मू : जम्मू काश्मीर येथून कलम ३७० हटवल्यानंतर खबरदारी म्हणून तिथल्या महत्वाच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण यातील काही अतिमहत्वाच्या सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरच्या घाटीत आता हॉटेल, शिक्षण संस्था, प्रवासासाठी ब्रॉ़डबॅंड सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तर जम्मूमध्ये २ जी मोबाईल इंटरनेट सर्व्हिस सुरु होणार आहे. जम्मूमध्ये ब्रॉडबॅण्ड आणि मोबाईल एसएमएस सेवा आधीपासूनच सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान जम्मू काश्मीर येथून इंटरनेट सहीत इतर बंदी हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारी रोजी दिले होते. त्यानंतर सूत्र वेगाने हलण्यास सुरुवात झाली आणि इंटरनेट सहीत इतर बंदीचे समीक्षण होऊन त्यावरील बंदी हटवण्यात येणार आहे. इंटरनेट हा जनतेचा अधिकार आहे.


अनुच्छेद १९ मध्ये लोकांच्या इंटरनेट स्वातंत्र्य लिहिले आहे. त्यामुळे ते अनिश्चित काळासाठी बंद ठेवू शकत नाही.


जम्मू काश्मीर येथील इंटरनेट बंदी हटवण्यासाठी सरकारने परिस्थितीचे परिक्षण करावे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायमुर्ती एनवी रमना यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. 



१४४ कलमाचा उपयोग प्रत्येकवेळी करता येणार नाही. काही ठराविक परिस्थितीतच जमावबंदीचे हे कलम वापरणे योग्य राहील असे देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले.