मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक सेक्टरमध्ये रिकवरी दिसून येत आहे. यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या व्यवसायामध्ये सुधारणा दिसून येत आहे. Covid Crisis नंतर कार, टीव्ही, फ्रिज आदींच्या खरेदीसाठी लोकांनी खर्च सुरू केला आहे. या हिशोबाने देशातील वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांच्या अर्थकारणात सुधारणा होण्याची आशा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरी देखील तज्ज्ञांचे मत आहे की, या सर्व घटनांनंतर पुढच्या काही काळात शेअर बाजारात 10 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.


व्याजदरासंबधीच घटनाक्रम
अमेरिकेत व्याजदरासंबधीत अनेक घटनाक्रम होत आहेत. भांडवली बाजारात तरलता वाढली आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी आहे. हे फक्त भारतात नाही तर, जगभरातील शेअर मार्केटमध्ये दिसून आले आहे.


शेअर बाजारात करेक्शन
बाजारत गेल्या अनेक दिवसांपासून 5-10 टक्के करेक्शन झालेले नाही. त्यामुळे पुढील काही महिन्यात शेअर बाजारात 5-10 टक्क्यांची घसरण होऊ शकते. 


बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा नाही
आता लोकांची आशा बँकिंग सेक्टरपासून आहे. बँक निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थिरता आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टर कंसोलिडेट आहे असं म्हणता येईल. बँकिंग सेक्टर पुढील काही दिवस तरी या चालीतून बाहेर येण्याची शक्यता नाही.


व्यवसायात अडचणी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे देशातील व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होत आहे. यामुळे दिलासा नक्कीच आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट आल्यास अर्थव्यवस्थेला पुन्हा धक्का लागू शकतो.