मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवात मोठ्या तेजीने झाली. परंतु नंतर शेअर बाजार सपाट झाला. आज सेंसेक्सने इतिहासात पहिल्यांदा 53 हजाराचा आकडा पार केला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सकाळी 311 अंकांच्या तेजीसह सुरू झाला. सकाळी 10:20 पर्यंत सेंसेक्सने 483 अंकाची उसळी घेतली आणि 53 हजारावर पोहचला. बाजार बंद झाला तेव्हा सेंसेक्स पुन्हा 52 हजार 588  वर बंद झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्येही आज तेजी पाहायला मिळाली. 15 हजार 840 वर निफ्टी ओपन झाला तर 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत निफ्टी 26.25 अंकांच्या तेजीसह 15772 वर बंद झाला.


ऑटो, पॉवर, आणि कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1 ते 2 टक्के तेजी दिसून आली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेक्टर हिरव्या रंगातच पहायला मिळाले. 


खासगीकरणाच्या बातम्यांनंतर इंडियन ओवरसिस बँक आणि सेंट्रल बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलाएन्स इंड्रस्ट्रीची एजीएम 24 जून रोजी होणार आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्येही तेजी येत आहे.