जम्मू : श्रीनगरच्या विमानतळाजवळ भारतीय जवानांच्या कम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. मात्र, हा हल्ला विमानतळावर करुन तो उडविण्याचा कट असल्याची माहिती पुढे आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफच्या १८२ व्या बटालियनच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. मात्र, हा हल्ला घडवून आणणारे जैश-ए-मोहमदचे दहशतवाद्यांना श्रीनगर विमानतळ निशाण्यावर होते. या हल्ल्यात बीएसएफचे सब-इंस्पेक्टर बी. के. यादव शहीद झाले, तर तीन अन्य जखमी झाले.


भारतीय सुरक्षा दलांच्या जवाबी कार्यवाहीमध्ये बीएसएफ कॅम्पमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी मारले गेलेले तीन दहशतवादी ११ सदस्य असलेल्या अफजल गुरु स्क्वॉडचा भाग होते. त्याने दोन गटांमध्ये विभागणी केली होती.ते  १६-१७ ऑगस्टच्या रात्री भारतामध्ये घुसले होते.


प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार ७ दहशतवादी सदस्य आधी सीमा ओलांडून घुसले होते. त्याच्या नंतर दुसरा गट पाकिस्तानच्या पंजाबच्या नारोळ भागातून भारतातील गुरदासपूर येथे दाखल झाला. त्यानुसार अफजल गुरु स्क्वाडच्या तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस कम्पवर हल्ला केला, त्यात ८ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले.