श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्हा स्थित एका शिबिरात बीएसएफच्या दोन जवानांमध्ये झालेल्या वादानं गंभीर वळण घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादानंतर एका जवानानं आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केला. यात जखमी झालेल्या जवानाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. 


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यात बीएसएफच्या शिबिरात काल रात्री हरियाणाचा रहिवासी असलेल्या चंद्रभान यांनी आपला सहकारी रविंद्र सिंह यांची कथितरित्या गोळी घालून हत्या केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र यांना ताब्यात घेण्यात आलंय तर चंद्रभान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिक चौकशी सुरू केलीय.