नवी दिल्ली : बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानतर्फे एसएसजी कमांडो आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जात असल्याची माहीती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. कच्छची खाडी भागातून लहान नौका वापरुन हे दहशतवादी आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू गस्त वाढवण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्यातर्फे गोळीबार करण्यात आला. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती अधिकच वाढल्या आहेत. प्रत्येक मार्गाने पाकिस्तान भारताला नामोहरण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न झाला पण तिथेही चीन व्यतिरिक्त कोणीही पाकिस्तानच्या मागे उभे राहीले नाही.



'युद्ध होईल'


ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होताना मी पाहतोय असे वक्तव्य इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या रेल्वे मंत्री शेख राशिद खान यांनी केले आहे. रावळपिंडीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. युद्ध होईलच असे नाही पण मोदीला समजण्यासाठी मोठ्या सत्ताधाऱ्यांनी जी चूक केली ती मी करु इच्छित नाही असे ते म्हणाले.