Buddha Purnima 2024 : गुरुवारी बुद्ध पौर्णिमेला तुमच्या शहरातील बँक राहणार बंद? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Buddha Purnima 2024 bank holiday : गुरुवारी बुद्ध पौर्णिमा असणार आहे. यादिवशी अनेक शहरातील बँका बंद असणार आहेत. तुमच्या शहरासह कोणत्या कोणत्या शहरात बँक बंद आहे जाणून घ्या संपूर्ण लिस्ट.
Bank Holiday on Buddha Purnima 2024 : गेल्या काही काळापासून थेट बँकेतून जाऊन काम करण्याचे प्रमाण कमी झालं असली तरी आजही या देशात असा एक वर्ग आहे, ज्यांच्या काम हे बँक जाणूनच होतं. शिवाय अशी अनेक कामं आहेत जी ऑनलाइन न होता त्यासाठी बँकेच्या पायऱ्या चढव्या लागतात. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण बुद्ध पौर्णिमे हा दिवस Bank Holiday आहे. त्यामुळे जर तुमचं बँकेत काही काम असेल तर ते आजच करुन घ्या नाही तर तुम्हाला वाट पाहावी लागेल.
हिंदू पंचांगानुसार 23 मे गुरुवारी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सुट्टीच्या यादीनुसार बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima Bank Holiday) अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. पण ग्रहाक डिजिटल बँकिंग म्हणजे ऑनलाइन व्यवहार करु शकणार आहेत.
बुद्ध पौर्णिमेला बँका कुठे बंद राहणार?
त्रिपुरा, महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद असणार आहेत.
25 मे रोजी बँकला सुट्टी?
त्रिपुरा, ओरिसामध्ये नजरुल जयंती/लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (चौथा शनिवार) निमित्त बँका बंद राहतील. त्याशिवाय चौथा शनिवार असल्याने देशातील महाराष्ट्रासह इतर राज्यातही बँका बंद असणार आहेत. 26 तारखेला रविवार असल्याने बँक बंद असेल. बँकेचे व्यवहार बंद राहणार असल्याने नागरिकांनी डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग द्वारे व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आलंय.