नवी दिल्ली : मध्यवर्गीय नोकदरांना अर्थसंकल्पातून निराशाच हाती आली आहे. सरकारने इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. त्यामुळे इन्कम टॅक्स सूट मिळण्याची मर्यादा ही आधीप्रमाणे २.५ लाख रूपये इतकीच राहणार आहे. तर टॅक्स वाचवण्याची मर्यादा १.५० लाख रूपयेच असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्कम टॅक्स भरणा-यांची संख्या गेल्या काही काळात वाढली आहे. नोटबंदीमधून साधारण १ हजार कोटी रूपये टॅक्स आला आहे. नोटबंदीनंतर ८५.५१ लाख नवीन टॅक्स भरणारे जोडले गेले आहेत. 


वरिष्ठ नागरिकांना सूट


सरकारने इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सर्वच नोकरदारांचा ४० हजारपर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन होणार. वरिष्ठ नागरिकांना बचत रकमेवर व्याजावर ५० हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. 


कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट


२५० कोटींचा टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना आता कमी टॅक्स द्यावा लागले. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कंपन्यांना मोठी सूट देण्यात आली आहे. अरूण जेटली यांनी घोषणा केली आहे की, २५० कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना २५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागेल. आधी ही सूट ५० कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्याना दिली जात होती. 


सध्याचा टॅक्स स्लॅब


० ते अडीच लाख – शून्य टक्के


२.५ लाख ते पाच लाख – ५ टक्के ( तीन हजारांची अतिरिक्त सूट )


५ लाख  ते दहा लाख – २० टक्के


१० लाखांपेक्षा जास्त – ३० टक्के


- २०१४-१५ मधील करदात्यांचा आकडा ६.४७ वरुन ८.२७ कोटींवर पोहोचला


२०१६-१७ या आर्थिक वर्षात ८.२७ कोटी नवीन करदाते वाढले