Budget 2019 : केंद्रातील एनडीएची नरेंद्र मोदी सरकार आज आपल्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहे. 11 वाजता सादर होणाऱ्या या बजेटकड़े देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीच्या आधी असलेल्या या अंतरिम बजेटमध्ये काय घोषणा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक विभागाची टीम, मंत्री आणि स्टेकहोल्डर्स सोबत मिळून हा बजेट तयार केला जातो. अरुण जेटली यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या विभागाचा भार पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पीयूष गोयल आज बजेट सादर करणार आहेत.


कोणी तयार केला अंतरिम बजेट 2019-20


केंद्रीय मंत्री अरुण जेटली
अंतरिम वित्त मंत्री पीयूष गोयल
पोन राधाकृष्णन   (राज्य अर्थमंत्री)
सुभाष चंद्र गर्ग    (आर्थिक विभागाचे सचिव)
शिव प्रताप शुक्ला ( अर्थ राज्यमंत्री)
अजय भूषण पांडे  ( राजस्व सचिव)
अजय नारायण झा ( सचिव)
सुशील चंद्र (सीबीडीटी चेअरमन)
पीके दास  (सीबीआयसी चेअरमन)
अतानु चक्रबर्ती (डिपार्मेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट सचिव)
राजीव कुमार  (वित्तीय सेवांचे सचिव)
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (मुख्य आर्थिक सल्लागार)
संजीव सन्याल (आर्थिक सल्लागार)


कडेकोट सुरक्षेमध्ये नॉर्थ ब्लॉकमधून बजेटच्या प्रती संसदेत आणण्यात आल्या. याबाबत फक्त 100 अधिकाऱ्यांना माहिती होती. बजेटच्या तयारी दरम्यान या सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर कोणासोबतही बोलण्याची परवानगी नसते. जेथे बजेटची छपाई होते तेथे फक्त इनकमिंग फोन वापरला जातो. अतिशय गुप्त पद्धतीने बजेट तयार केला जातो.