नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थे पुढे सध्या अनेक आव्हानं आहेत त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार?


१. यंदा बजेटमध्ये टॅक्स स्लॅबची सीमा वाढवली जाण्याची शक्यता आहे.
२. ग्रामीण भारतात अधिक खर्च केला जावू शकतो.
३. महिलांच्या सुरक्षेततेसाठी काही घोषणा होऊ शकतात.
४. स्वच्छ पेयजलसाठी अधिक तरतूद केली जावू शकते.
५. शिक्षणावर १ लाख कोटीपेक्षा अधिकची तरतूद केली जावू शकते.
६. मेक इन इंडियावर नवी योजना सुरु केली जावू शकते.
७. निर्यात वाढवण्यासाठी नव्या योजनांची घोषणा होऊ शकते.
८. रोजगार वाढवण्यासाठी छोट्या उद्योगांना पॅकेज दिले जावू शकते.
९. इंफ्रास्ट्रक्चरवर सरकार आणखी खर्च वाढवला जावू शकतो.
१०. रेल्वेमध्ये सरकार आणखी मोठी गुंतवणूक करु शकते.
११. घरगुती उत्पादनांना चालना देण्यासाठी इतर प्रोडक्टवर इंपोर्ट ड्यूटी लावली जावू शकते.
१२. शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या योजनेतून मिळणारी रक्कम ६००० वरुन ८००० केली जावू शकते.