Budget 2020: आयकर भरणाऱ्या करदात्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता
आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे.
नवी दिल्ली : आयकर भरणाऱ्या नोकरदार वर्गाचे लक्षही अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे. वैयक्तीत करदात्यासाठी कर सवलतीची मर्यादा ६ लाख २५ हजार करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. जर या उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आयकर भरणाऱ्या लोकांना टॅक्समधील सूट २.५ लाखावरुन ३ लाखापर्यंत होण्याची शक्यता आहे. तर ५ लाख ते ७.५० लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के टॅक्स लागण्याची शक्यता आहे. हा एक नवा स्लॅब तयार केला जावू शकतो. तर गुंतवणुकीवरील टॅक्समधील सूट दीड लाखाहून २ लाखापर्यंत केली जाण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थे पुढे सध्या अनेक आव्हानं असताना या अर्थसंकल्पातून काय घोषणा होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी ११ वाजता बजेट सादर केलं जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी ग्रोथ ६ ते ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे.