नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वच क्षेत्रात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारने 2021-22 या वर्षात नव्या योजना आणल्या आहेत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी बजेट वाढवण्यात आलं आहे. कोरोनामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या क्षेत्राला किती कोटी


+ आरोग्य क्षेत्रासाठी २.२३ लाख कोटी 
+ कोविड वॅक्सीनसाठी ३५ हजार कोटी
+ आत्मनिर्भर योजना ६४,१८० कोटी
+ वायु प्रदुषण : २२१७ कोटी 
+ पायाभूत सुविधा २० हजार कोटी 
+ स्वच्छता अभियान : ७१ हजार कोटी 
+ जल जीवन : २.८७ कोटी
+ परिवहन : १.९७ कोटी रूपये 
+ प.बंगाल, आसाम, तमिळनाडूत रस्ते प्रोजेक्टसाठी मोठी घोषणा
+ विमा कायद्यात बदल 
+ विमा क्षेत्रात ७४ टक्के एफडीआय आणले जाणार
+ ७५ हजार हेल्थ सेंटर 
+ १५ हेल्थ इमर्जन्सी सेंटर
+ २ मोबाईल रूग्णालय 


२०२१-२२ मध्ये ६.८ टक्के वित्तीय तूट असेल