नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिलाय. त्यांना आता ITR भरावा लागणार नाही. पेन्शन धारक किंवा व्याजावर मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारीत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हा दिलासा असणार आहे. 75 वयापेक्षा जास्त वय असलेल्यांना टॅक्स रिटर्न भरणं हे मोठं आव्हान असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जग मोठ्या संकटातून जात असताना देखील सर्वांच्या नजरा या भारताकडे होत्या. अशावेळी करदात्यांना चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. या पार्श्वभुमीवर निर्मला सितारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष घोषणा केलीय. 


यानुसार ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांना ITR भरावा लागणार नाही. पेंशन घेणाऱ्या व्यक्तींना हा लाभ मिळणार आहे. एनआरआय लोकांना टॅक्स भरण्यासाठी खूप अडचणी यायच्या. पण त्यांना आता डबल टॅक्स सिस्टिममधून सवलत देण्यात येणार आहे. 


नॅशनल रिसर्च फाऊंडेशनवर पुढच्या 5 वर्षात 50 हजार कोटी खर्च होणार आहेत. डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 1500 कोटींची घोषणा करण्यात आली. करार वाद सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधार केला जाणार असल्याचे सितारमण म्हणाल्या.



काय गोष्टी स्वस्त होणार?


चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार 
ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार 
लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार 
रंग स्वस्त होणार 
स्टीलची भांडी स्वस्त होणार 
इंश्युरन्स स्वस्त होणार 
वीज स्वस्त होणार 
चप्पल स्वस्त होणार 
नायलॉन स्वस्त होणार 
सोनं-चांदी स्वस्त होणार


या गोष्टी महागणार?


मोबाइल आणि चार्जर महागणार 
तांब्याच्या गोष्टी महागणार 
इलेक्ट्रॉनिक सामान महागणार 
कॉटनचे कपडे महागणार 
रत्न महागणार 
लेदलच्या गोष्टी महागणार 
सोलर इन्वर्टर महागणार