मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतच संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईलप्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द करण्यात आल्या आहेत. पण मोबाईल आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तुंवर कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. ज्या पार्ट्सवर शून्य टक्के कस्टम ड्युटी होती ती आता 2 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


मोबाईल आणि चार्जर महागणार आहेत. नवीन मोबाईल घेणार असाल तर या आर्थिक वर्षात तुमच्या खिशावर अधिक भार पडण्याची शक्यता आहे. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे
डायरेक्ट टॅक्स
कॉर्पोरेट टॅक्सचा दर कमी केला होता. 2014च्या तुलनेत ITR भरणाऱ्यांची संख्या अधिक 
75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आणि पेन्शनर असलेल्यांना ITRमधून सूट
कर चुकवणाऱ्यांसाठी पुन्हा केस रिओपन करणाऱ्यांना 6 वर्षाच्या कालावधिवरून 3 वर्षांचा कालावधि करण्यात येणार 
कराशीसंबंधीत वाद सोडवण्यासाठी संस्थेची स्थापना
छोट्या करदात्यांसाठी डिस्प्युट रिझोल्युशन कमिटिची स्थापना
कराशीसंबंधीत वाद सोडवण्यासाठी ही समिती मदत करणार
समितीमधील अधिकाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जाणार
व्यावसायिकांसाठी 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांनाच ऑडिट बंधनकारक
डिव्हिडन्टला TDS लागणार नाही
परदेशी गुंतवणूकदारांनासुद्धा काही प्रमाणात TDSवर सूट 
परवडणारी घर बांधणाऱ्या बिल्डरसाठी टॅक्समध्ये 1 वर्षासाठी सूट
परवडणाऱ्या भाड्याच्या घरांसाठी असलेल्या स्कीममध्ये 1 वर्षाने वाढ
PF कापला जातो पण खात्यावर जमा होत नसेल तर त्याचा लाभ कंपनीला मिळणार नाही
कंपनीला PF कापल्यानंतर कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक
GST
80 न लागू होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द
मोबाईल पार्टमध्ये 0 कस्टम ड्युटी असलेल्यांना 2 टक्के लागणार
मोबाईल आणि चार्जर महागणार 
सोनं आणि चांदी स्वस्त होणार
लोखंड आणि स्टील स्वस्त होणार