मुंबई : Budget 2022 Summary Kisan Drones News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्यांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, एमएसपीद्वारे 2.37 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराचा उल्लेख केला. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते, परंतु शेतीसाठी ड्रोनचा वापर भारतात क्वचितच ठिकाणी सुरू आहे. सरकार डिजिटलायझेशन आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी 'फार्मर ड्रोन' वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. सरकार कृषी स्टार्ट-अप आणि ग्रामीण भागात शेतीला फायदेशीर ठरणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यार आहे.


ड्रोन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, शेतीसाठी योग्य असे ड्रोन अद्याप देशात बनलेले नाहीत. सध्या इफकोसारख्या काही सहकारी संस्था ड्रोनच्या वापरावर काम करत आहेत. त्या संस्था शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही देत ​​आहे. सरकार शेतकरी संघटनांना ड्रोन खरेदीसाठी अनुदानही देत ​​आहे. परदेशात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो.


काय म्हटल्या अर्थमंत्री
शेतकऱ्यांना डिजिटल आणि 'हाय-टेक' सेवा देण्यासाठी, सरकार खाजगी कृषी तंत्रज्ञान कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन संस्थांसह  PPP तत्त्वावर योजना सुरू करेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.