मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून ते 8 एप्रिल 2022 रोजी संपणार आहे. सरकार दरवर्षी अर्थसंकल्प सादर करते. ब्रिटिश काळापासून ही परंपरा सुरू आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री एका कढईत हलवा बनवून वित्त मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना खायला घालतात. अशा अनेक इंटरेस्टींग गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल ब्रीफकेस



भारतात अर्थमंत्री बजेट सादर करण्यासाठी तपकीरी रंगाची ब्रीफकेस आणत असत, परंतु 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय लूक देत लाल रंगाची कापडाची बनवलेली ब्रीफकेस आणली आणि ती घेऊन त्या संसदेत पोहचल्या. ब्रीफकेसची संकल्पना ब्रिटीश संस्कृतीतून आली. त्याची सुरुवात बजेट प्रमुख विल्यम ग्लॅडस्टोन यांनी केली होती. ते त्यांच्या लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यामुळे सर्व कागदपत्रे ठेवण्यासाठी त्यांना ब्रीफकेस आणत असत.



ब्लू शीट



केंद्रीय अर्थसंकल्पाची सुरुवातीची कागदं निळ्या रंगाची असतात. ज्याला अर्थसंकल्पाची ब्लू प्रिंट म्हणतात. ती गोपनिय असते. त्याची जबाबदारी अर्थसंकल्पाच्या सचिवावर  असते.


हलवा वाटप



अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर ते छपाईला जाते. त्याआधी हलवा करून सर्व कर्मचाऱ्यांना भरवणे ही एक मजेशिर आणि आनंदायी गोष्ट असते. यासाठी अर्थमंत्री एका कढईत हलवा बनवून अर्थ मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना खायला देतात. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या छपाईची प्रक्रिया सुरू होते.


ब्लॅक बजट



1973-74 मध्ये जास्त वित्तीयतुटीमुळे अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' असे नाव देण्यात आले. तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे बजेट सादर केले होते.


ड्रीम बजेट



1997 मध्ये वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट कर कमी करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आणि बजेटला 'ड्रीम बजेट' असे नाव देण्यात आले.