मुंबई : 2021 मध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली होती. विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे बाजाराला सपोर्ट मिळाला आणि बाजारातील सेंटीमेंट मजबूत झाले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स जवळपास 24 टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, अर्थसंकल्पानंतर, एका महिन्यात सेन्सेक्स 2.6 टक्के किंवा सुमारे 1249 अंकांनी मजबूत झाला. यंदाचा अर्थसंकल्प अशा वेळी सादर होणार आहे. जेव्हा देशात कोविड 19 चे रुग्ण पुन्हा वाढत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात अस्थिरता कायम आहे. जागतिक स्तरावरही महागाई आणि व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर बजेटवर नजरा खिळल्या आहेत. यंदाचाही अर्थसंकल्प विकासाभिमुख असण्याची अपेक्षा आहे. 
आता आगामी काळात शेअर बाजारात तेजी येणार की घसरण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2010 पासून आजपर्यंतची आकडेवारी पाहिली तर ती बाजाराला अनुकूल राहिली आहे. 12 वर्षात 7 वेळा अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स तेजीत राहिला झाला आहे.


2021 च्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार


2021 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर अर्थसंकल्पानंतर महिनाभरात सेन्सेक्स 2.6 टक्क्यांनी वधारला होता. 1 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सेन्सेक्स 48601 ते 49850 पर्यंत वाढ झाली. अर्थसंकल्पाच्या दिवशी, 1 फेब्रुवारीला, सेन्सेक्स 2314 अंकांच्या म्हणजेच 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी 647 अंक किंवा 4.75 टक्क्यांनी वाढला.


2010 ते 2020: बजेटनंतरचे दिवस


  • 2020 च्या अर्थसंकल्पानंतर एका महिन्यात सेन्सेक्स सुमारे 3.5 टक्क्यांनी घसरला होता. 

  • सन 2019 मध्ये अर्थसंकल्पानंतर एका महिन्यात सेन्सेक्स 4.6 टक्क्यांनी वाढला आहे.

  • अर्थसंकल्पानंतरच्या एका महिन्यात 2018 मध्ये सेन्सेक्सने 5.18 टक्क्यांची घसरण नोंदवली.

  • वर्ष 2017 मध्ये, बजेटनंतर मार्केटमध्ये तेजी आली आणि सेन्सेक्स 1 महिन्यात 3 टक्के वाढला.

  • 2016 मध्येही अर्थसंकल्पानंतर बाजारात मोठी रॅली दिसून आली. एका महिन्यात सेन्सेक्स 6.5 टक्क्यांनी वाढला.

  • 2015 च्या अर्थसंकल्पानंतर बाजारात दबाव होता. पुढील 1 महिन्यात सेन्सेक्स 4.7 टक्क्यांनी घसरला.

  • 2014 मध्ये अर्थसंकल्पानंतर एका महिन्यात सेन्सेक्स 6.69 टक्क्यांनी  वाढला.

  • सन 2013 मध्ये अर्थसंकल्पानंतर बाजार घसरला. पुढील 1 महिन्यात सेन्सेक्स 0.14 टक्क्यांनी घसरला.

  • 2012 च्या अर्थसंकल्पानंतर बाजारात घसरण झाली. पुढील 1 महिन्यात सेन्सेक्स 1.80 टक्क्यांनी घसरला.

  • 2011 मध्येही पोस्ट बजेट मार्केटमध्ये मोठी वाढ झाली होती. अर्थसंकल्पानंतर 1 महिन्यात सेन्सेक्स 6.28 टक्क्यांनी वाढला होता.

  • 2010 मध्ये बजेटनंतर मार्केटमध्ये तेजी आली होती. पुढील एका महिन्यात सेन्सेक्स 7.40 टक्क्यांनी वाढला.