7th pay commission : अखेर तो दिवस आलाच! सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी
7th pay commission : सरकारी कर्मचारी म्हटलं, की त्यांच्या पगाराची चर्चा होतेच. त्यांच्या पगाराची चर्चा झाली की वेतन आयोगावरही लक्ष जातं. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरी करतंय का?
7th pay commission : वर्षाचा पहिलाच महिना सुरु असला तरीही अनेकांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे वार्षिक पगारवाढीचे (salary hike), अर्थात Appraisals चे. यावेळी तरी समाधानकारक पगारवाढ मिळूदे अशीच प्रार्थना नोकरदार वर्गाकडून करण्यात येत आहे. बरं, हे झालं खासगी संस्थांमध्ये (Private sector jobs) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल. कारण, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरात पगारवाढीशी संबंधित बऱ्याच गोड बातम्या ऐकायचा मिळतात. त्यात एक बातमी सातत्यानं असते ती म्हणजे वेतन आयोगाची (Pay Commission).
सरकारी कर्मचारी होणार मालामाल... (Government jobs)
देशाचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ही पगारवाढ विचारात येऊन तिला स्वीकृती मिळू शकते.
हेसुद्धा वाचा : Salary Hike: जास्त मुलांना जन्म द्या पगारवाढ मिळवा; मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात केली घोषणा
केंद्र शासनाकडून (Central Government) या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल यात शंकाच नाही. या तरतुदीमुळं कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये इतकं होणार आहे. ज्यामुळं त्यांच्या मूळ वेतनात महिन्याला 8 हजार रुपये आणि वर्षाला 96 हजार रुपये इतकी वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरमुळं हे सर्व शक्य होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
आता तुम्ही म्हणाल हे फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) म्हणजे नेमकं काय प्रकरण? तर ही एक प्रकारची Common Value आहे ज्याचा वापर कर्मचाऱ्यांचा एकूण पगार ठरवण्यासाठी केला जातो. यामध्ये एकूण पगाराचा आकडा मिळवण्यासाठी तिला (Basic Pay) मूळ वेतनाशी गुणाकारात मोजलं जातं. सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. याचाच अर्थ असा की, 4200 ग्रेड पेमध्ये कुणा कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 15500 रुपये आहे तर त्याचा एकूण पगार 15500 X 2.57 म्हणजेच 39835 इतका असेल.
सरकारी कर्मचाऱ्यांचा यंदाचा महागाई भत्ता वाढणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा DA यंदाच्या वर्षी 31 जानेवारीला वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढवून दिला जातो. यंदाच्या वर्षी याची सुरुवात जानेवारीपासूनच होणार आहे. मागील वर्षीच्या नोव्हेंबरमधील आकडेवाडीच्या आधारे 3 टक्क्यांनी डीए वाढेल. परिणामी यापुढं त्याचं प्रमाण 38 टक्क्यांवरून 41 टक्के इतकं असेल. त्यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांनी आकडेमोड करण्यास सुरुवात केलेली बरी!