Budget 2023 Live Updates : देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्याविषयीच्या अनेक गोष्टी नागरिकांमध्ये चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे हा (Indian Budget histrory) अर्थसंकल्प केव्हापासून सुरु झाला इथपासून तो कोण तयार करतं, त्याचं महत्त्वं काय आणि त्यापूर्वी गोडाधोडाचा पदार्थ म्हणून हलवा का बनवला जातो इथपर्यंतचे प्रश्न विचारले गेले. एकिकडे या प्रश्नांचा मारा सुरु असतानाच दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या प्रत्येक शब्दाकडे नागरिकांचं लक्ष असल्याचं दिसून आलं. त्या नेमकं काय म्हणतात, कोणत्या शब्दावर त्यांचा जोर आहे हे सगळेच बारकावे त्यात आले. (Budget 2023 interesting facts about nirmala Sitharaman And her speech live latest Marathi news )


काही शब्दांचा प्रामुख्यानं वारंवार उच्चार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का, अर्थसंकल्प सादर करताना काही शब्दांचा वापर सर्रास आणि सातत्यानं होत असतो. यामध्ये नेमके कोणते शब्द येतात याचा कधी विचार केलाय का? गेल्या 4 वर्षांमध्ये सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हातेव्हा त्यांनी काही शब्दांचा प्रामुख्यानं वारंवार उच्चार केला. बरं, त्यांनी हा शब्द किती वेळा उच्चारला याची आकडेवारीही समोर आली आणि अनेकजण थक्कच झाले. 


हेसुद्धा वाचा : Budget Expectations 2023 : अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांच्या 10 मोठ्या अपेक्षा, आपल्या कामाची कोणती आहे?


 


निर्मला सीतारमण यंदा पाचव्यांदा केंद्र सरकारच्या वतीनं देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यातही त्या किती वेळ हा अर्थसंकल्प सादर करतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल. कारण मागच्या चार वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास आतापर्यंतचा सर्वाधिक काळ सादर झालेला अर्थसंकल्प 2019 या वर्षातील होता. 
2019              2:17 तास
2020              2:41 तास
2021              1:40 तास
2022              1:30  तास


चारही अर्थसंकल्पाममध्ये सीतारमण यांनी Investment, Electronic, Technology, Housing, Infrastructure, health, Development या शब्दांचा सर्वाधिक वापर केला होता. आता त्यांनी कोणत्या वर्षी कोणत्या शब्दाचा वापर किती वेळा केला हेसुद्धा तितकंच रंजक. पाहून घ्या याविषयीची आकडेवारी. 


2022 मध्ये सर्वाधिक वापरलेले शब्द 
इंफ्रास्ट्रक्चर- 27 वेळा 
डेवलपमेंट- 33 वेळा 
डिजिटल - 35 वेळा 


2021 मध्ये सर्वाधिक वापरलेले शब्द 
इंफ्रास्ट्रक्चर- 57 वेळा 
हेल्थ - 31 वेळा 
डेवलपमेंट- 28 वेळा 


2020 मध्ये सर्वाधिक वापरण्यात आलेले शब्द 
डेलवपमेंट- 48 वेळा 
डेलवपमेंट- 33 वेळा 
एज्युकेशन - 25 वेळा 
हाऊसिंग - 24 वेळा 


2019 मध्ये कोणत्या शब्दांचा वापर अधिक झाला? 
इन्वेस्टमेंट- 35 वेळा 
इलेक्ट्रॉनिक - 22 वेळा 
टेक्नोलॉजी- 18 वेळा