Budget 2023 : PM Awas Yojana संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार
हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2023 Updates : देशाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023 ) पीएम आवास योजनेंसंदर्भात (PM Aawas yojana) मोठी घोषणा करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येकाच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister nirmala sitharaman ) यांनी सलग चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. बजेटकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत. पीएम आवास योजने अंतर्गत केंद्र सरकारच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना घर बांधण्यासाठी अनुदान (सबसिडी) दिले जाते. या अनुदानात बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पीएम आवास योजनेसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे. जे नागरीक अद्याप हक्काचं घर घेवू शकले नाहीत. त्यांना या योजनेचा निश्चित फायदा होणार. अर्थसंकल्पात पीेएम योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्यामुळे अधिका अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या शहरी तसेच ग्रामी भागात हजारो नागरिक पीएम आवास योजनेचा लाभ घेत आहेत.
काय आहे PM आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना याचा लाभ मिळतो. तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेलेले या योजनेचे लाभार्थी ठरु शकतात. ज्यांचे उत्पनन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे त्यांना स्वत:चे घर नाही अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत घर खरेदीसाठी अर्त सहय्य दिले जाते. या य़ोजनेअंर्तंगत लाभार्थ्यांना घर खरेदीसाठी 2.50 लाखांची मदत दिली जाते. यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. पहिला हप्ता 50 हजार. 1.50 लाखांचा दुसरा हप्ता. तर तिसरा हप्ता 50 हजारांचा दिला जातो. राज्य सरकार एकूण 2.50 लाख रुपयांपैकी 1 लाख देते. त्याचबरोबर केंद्र सरकार 1.50 लाखांचे अनुदान देते.
PM आवास योजनेसाठी अर्ज कसा कराल
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जा
तुम्हाला वेबसाइटच्या शीर्षस्थानी 'नागरिक मूल्यांकन' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतीस. तुम्ही तुमच्या लोकशेननुसार पर्याय निवडा.यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा
सबमिट केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक दिसेल
या अर्ज क्रमांकानुसार तिम्ही अपडेट घेवू शकता.