केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुन्या वाहनांसंबधी धोरण जाहीर केलं आहे. जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारची जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी पुरेसा निधी देण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. 


Automated Fitness Testing Stations आणि नोंदणीकृत स्क्रॅपिंग सुविधा स्थापित करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सप्टेंबर 2021 मध्ये नियमावली तयारी केली होती. इको-फ्रेंडली पद्धतीने अयोग्य आणि प्रदूषित वाहनांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यासाठी स्क्रॅपिंग योजनेची डिजिटल आणि वापरकर्ता-अनुकूल अंमलबजावणी सक्षम करणे ही कल्पना होती.