Whats become cheaper and Whats costlier: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला असून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारने (Modi Government) या बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसंच दुसरीकडे मोबाईल, एलईडी टीव्हीसारख्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा भाग असणारं सोने-चांदी मात्र महागणार आहे. नेमक्या कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या महागल्या आहेत हे जाणून घ्या. 


काय स्वस्त होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) एलईडी टीव्ही 
2) टीव्हीचे सूटे भाग
2) इलेक्ट्रिक वस्तू
3) मोबाईल फोन, पार्ट्स 
4) इलेक्ट्रिक वाहने 
5) खेळणी
6) कॅमेरा लेन्स


काय महागणार?


1) सोन्याचे दागिने 
2) चांदीचे दागिने
3) चांदीची भांडी
4) विदेशी किचन चिमणी
5) सिगरेट


सोने आणि चांदीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सोने, चांदी महागणार आहे.


पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता


डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलॉकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. याशिवाय सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.