Budget 2023 Updates : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) योग्य दिशेने आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी व्यक्त केला आहे. निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करताना सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय सांगताना करोना काळाची आठवण करुन दिली. यावेळ त्यांनी कोरोनाच्या (Covid 19) काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असे निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. 


भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला आहे. भारत जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीतून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. "जगाने भारताला एक तेजस्वी तारा म्हणून ओळखले आहे, चालू वर्षासाठी आमची वाढ ७.०% एवढी आहे, महामारी आणि युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी असूनही, सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये ही सर्वाधिक आहे," असं त्या म्हणाल्या. 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात बाजरीचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.