Budget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या
Budget 2024: कोणत्या वस्तू स्वस्त होणार? जाणून घेऊया.
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण बिहार, आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती, त्याचबरोबर उद्योग याक्षेत्रांसाठी घोषणा जाहीर केल्या आहेत.दरम्यान अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
निर्मला सितारमण यांनी आपल्या बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था सलग चमकतेय. पूर्ण बजेट यावर केंद्रीत आहे. कृषि क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर आपला जोर आहे. ही विकसित भारतासाठी पहिली प्राथमिकता आहे. त्यांनी सरकारच्या 9 प्राथमिकता सांगितल्या. त्यामध्ये कृषी, शहरी विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, कृषी संशोधन, उर्जा सुरक्षा, इनोव्हेशन, रिसर्च आणि ग्रोथचा समावेश आहे.
कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सितारमण यांनी केली मोबाईल आणि मोबाईल चार्जरसहित इतर उपकरणांवरील बीसीडी 15 टक्क्यांनी घटवली आहे. याशिवाय सोने आणि चांदीची कस्टम ड्युटी कमी करुन 6 टक्के इतकी केली आहे.यामुळे सोन्या चांदीच्या किंमती कमी होणार आहेत. याशिवाय लेदर, फूटवेअर आणि कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली आहे. दुसरीकडे टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत. यावरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
काय स्वस्त होणार?
मोबाईल फोन, चार्जर स्वस्त होणार आहेत. मोबाईल, चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
सोनं चांदी स्वस्त होण्याची शक्यता
चप्पल, शूज, कपडे स्वस्त होणार
लिथियम बॅटरी स्वस्त होणार आहेत. यामुळे इलेक्ट्रिक कार्सदेखील स्वस्त होणार आहेत.
मोबाईलचे पार्ट्स स्वस्त होणार आहेत.
इंपोर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार, एक्स रे मशीन स्वस्त होणार तर प्लास्टिकच्या वस्तू महागणार
रसायन पेट्रोकेमिकल्स
पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
मासे थाळी
काय होणार महाग?
प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत.
टेलिकॉम उपकरणे महाग