नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केलं जाणार आहे. बजेट प्रिटिंगचं काम अंतिम टप्प्यात आहे. हलवा सेरेमनीनंतर बजेट संदर्भातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा बाहेरच्या जगाशी संपूर्ण संपर्क तुटला आहे. अर्थ मंत्रालयासह सपूर्ण नॉर्थ ब्लॉकमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बजेट प्रिटींगच्या आधी अर्थमंत्रालयाने हलवा सेरेमनी ठेवली होती. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गोड खाण्याची भारतीय परंपरा बजेटवर देखील लागू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजेट गोपनीय ठेवण्यासाठी प्रिटिंगचं काम अर्थ मंत्रालयाच्या बेसमेंटमधील गुप्त प्रिटिंग प्रेसमध्ये केलं जातं. येथे कोणालाही येण्याची परवानगी नसते. प्रिटिंग प्रेसमध्ये फक्त एक लॅडलाईन फोन आहे. ज्यामध्ये फक्त इनकमिंग सेवा आहे. काही मोजक्या अधिकाऱ्यांनाच येथे येण्याची परवानगी असते.


बजेटच्या कागदपत्रांच्या प्रिंटिंगची सुरुवात ब्लू शीटच्या प्रिटिंगने होते. ज्यामध्ये अर्थव्यवस्था आणि बजेट संदर्भातील आकडे असतात. ही ब्लूशीट जवळ ठेवण्याची परवानगी अर्थमंत्र्यांना देखील नसते. नवा आकडा येताच त्याला अपडेट केलं जातं. ब्लू शीटमध्ये बजेट प्रस्तावा शिवाय पुढच्या वर्षी कोणत्या योजना अमंलात आणल्या जाणार आणि त्यासाठी किती खर्च केला जाणार याची माहिती असते. बजेटची सीक्रेट प्रिंटिंग 1950 पर्यंत राष्ट्रपती भवनमध्ये होत होती. पण 1950 मध्ये बजेट लीक झाल्यानंतर ही सरकारी प्रिटिंग प्रेस मिन्टो रोड येथे हलवण्यात आली. 1981 मध्ये नॉर्थब्लॉकच्या आतमध्ये असलेल्या अर्थमंत्रालयाच्या बेसमेंटमध्ये याची प्रिटींग केली जाते.