नवी दिल्ली : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे. गुजरातमधल्या साबरमती इथे हा भूमीपूजन समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकल्पामुळे महाराष्ट्र सरकारचा कोणताही महसूल बुडणार नसल्याचं, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय. त्याचवेळी तोंडावर येऊन ठेपलेली गुजरात विधानसभा निवडणूक आणि बुलेट ट्रेन प्रकल्प यांचा काहीही संबंध नसल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.