बिहार : दिल्लीच्या बूरारी मृत्यूप्रकरणाची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली आहे. एकाच कुटूंबातील पाच जंणानी गळफास घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन पूरूषांचा तर दोन महिलांचा समावेश आहे. या घटनतेली दोघे मुलं अल्पवयीन होती. या घटनेने संपूर्ण बिहार हादरलयं. या प्रकरणाचा तपास पोलिस करतायत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी घरात गळफास घेतल्याची घटना घडलीय. विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौ धनेशपूर दक्षिण गावातून ही घटना घडली. मनोज झा 42 वर्षीय,  सुंदर मणी 38 वर्षीय, सीता देवी  65 वर्षीय,  सत्यम 10 वर्षीय आणि शिवम 7 वर्षीय अशी गळफास घेतलेल्या मृतांची नावे आहेत. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पत्नी सुंदर मणी, आई सीता देवी आणि मुले सत्यम आणि शिवम यांच्यासह या घरात राहत होता. मनोजला दोन मुलीही आहेत, त्यापैकी एक मुलगी निभा तिच्या पतीसोबत माहेरी आली होती. निभाने सांगितले की, ती आणि तिचा नवरा दुसऱ्या खोलीत झोपला होता. सकाळी जाग आल्यावर शेजारील खोली उघडी होती आणि घरातील पाच जणांचे मृतदेह फासावर लटकलेले दिसले. मृतदेह पाहताच तिने आरडाओरड केली आणि ही घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 


आर्थिक विवंचनेमुळे उचललं पाऊल 


मनोज झा ऑटो चालवून आणि खैनी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घराचा गाडा हाकण्यासाठी मनोज यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण न केल्यामुळे मनोज झा खूप अस्वस्थ असायचे.मनोज दिलेल्या मुदतीत कर्ज परत करू शकले नव्हते. सातत्याने प्रयत्न करूनही त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होत नव्हता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच पैसे पैसे देणारे सतत त्यांच्या घरी येत असत. अखेर आर्थिक विवंचनेमुळे संपूर्ण कुटुंबानेच हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.


पोलीस काय म्हणाले? 
प्राथमिक तपासात मृत व्यक्तीने कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठीही मनोजने या लोकांकडून कर्ज घेतले होते. कुटुंबावर कर्जाचा ताण होता, त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंब नाराज असल्याचेही शेजाऱ्यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल अशी माहिती एसपी हृदयकांत यांनी दिली.