चेन्नई : नोटाबंदीमुळे देशाला फायदा झाला की तोटा, हा वाद सुरूच राहणारा आहे, पण नोटाबंदीचा एक किस्सा लुटारूंना पकडल्यानंतर समोर आला आहे. ५ लुटारूंनी २०१६ मध्ये धावत्या रेल्वेतून पैशांची लूट केली. ती कोट्यवधी रूपयांची लूट आता उघड झाली आहे. धावत्या रेल्वेतून लूट करण्याचा हा रंजक आणि थरारक किस्सा आहे. पण या चोरांचं नशीब एवढं खराब होतं की, या नोटा पूर्णपणे खर्च करण्याआधी मोदींनी देशात नोटाबंदीची घोषणा केली. यामुळे लुटलेले कोट्यवधी रूपये त्यांच्यासाठी कागदं ठरले.


हा थरारक किस्सा एकदा तरी वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या लुटारूंना पकडण्यात आल्यावर त्यांनी माहिती दिली आहे की, त्यांनी लुटलेले २ कोटी रूपये नोटाबंदीच्या घोषणेनंतर जाळले. कारण हे पैसे न त्यांना वापरता येणार होते, ना पैसे बँकेत टाकता येणार होते, म्हणून त्यांनी हे पैसे जाळून टाकले. आता २ वर्षानंतर हे प्रकरण उघड झाल्यानंतर, या ५ लुटारूंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


५ कोटी ७८ लाख धावत्या रेल्वेतून लुटले


'द हिंदू' या इंग्रजी पेपरच्या बातमीनुसार, ८ ऑगस्ट २०१६ रोजी ३४२ कोटी रूपये रेल्वेच्या माध्यमातून इंडियन ओव्हरसीज बँकमधून, रिझर्व्ह बँकेला चेन्नईत पाठवले जात होते. दरम्यान ५ लुटारूंनी ५ कोटी ७८ लाख रस्त्यातच लुटले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गँगचा प्रमुख मध्यप्रदेशातील गुनामधील आहे, त्याचं नाव मोहरसिंह आहे. हे पाचही लुटारू २०१६ मध्ये तामिळनाडूत आले होते.


धावत्या ट्रेनमधून बँकेचे पैसे लुटण्याचा थरारक किस्सा


या गँगचा प्रमुख मोहर सिंहला माहित झालं की, सलेम-चेन्नई एक्स्प्रेसने मोठ्या प्रमाणात कॅश पाठवली जाते. यानंतर गाडी लुटण्याची योजना बनवण्यात आली. ३ जणांना रेल्वेवर नजर ठेवण्यास सांगितलं. यांनी अनेक वेळा या गाडीत प्रवास केला. यानंतर रेल्वेगाडी कशी लुटायची याची योजना तयार केली.


रेल्वेच्या छतावर चढून लूट


ही लूट विरुदचलम आणि चिन्नासलम स्टेशन दरम्यान केली गेली. दरोडा टाकला तेव्हा मोहरसिंह आपल्या ४ साथीदारांसह गाडीच्या छतावर चढला. यानंतर मोहरसिंहसोबत ते पार्सल वॅनच्या छतावर पोहोचले.


रेल्वेचं छत कापून आत प्रवेश


दरोडेखोरांनी छताला कापून आत प्रवेश केला. ते याच कोचमध्ये घुसले, ज्यात लोकडी पेटीत पैसे ठेवले होते. पेटीतोडून त्यांनी कॅश काढली. या कॅशला कपड्यात भरून त्यांनी ठरलेल्या जागी पैसे फेकले. या ठिकाणी त्यांचा साथीदार आधीच तैनात होता. त्याने ते पैसे ताब्यात घेतले. यानंतर संधी मिळताच दरोडेखोरांनी रेल्वेतून उड्या टाकल्या.


अखेर याला म्हणतात नशीब खराब आणि 'कानून के हात'


यानंतर हे आरोपी मध्य प्रदेशात पोहोचले. नोटाबंदी लागू होण्याच्या आधी त्यांनी १ कोटी ७६ लाखांची जमीन खरेदी केली. उरलेले पैसे त्यांनी आपसात वाटले. पण नोटाबंदी लागल्यानंतर त्यांनी २ कोटी रूपये जाळून टाकल्याची कबुली दिली आहे. इतर पैसे आणखी कुठे देण्यात आले याचा शोध सुरू आहे.