श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आणि दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा होऊन शनिवारी वर्ष पूर्ण होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा कट हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन रचतोय अशी माहिती समोर आलीय. 


सलाहुद्दीननं 8 जुलैला काश्मीर खोऱ्यात बंदची हाक दिली असून संपूर्ण आठवडा निदर्शनं करण्याचे आवाहन केलंय. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय.


जम्मू काश्मीरमध्ये २१ हजार अतिरिक्त अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आलेत. ८ जुलैला दहशतवादी अथवा फुटीरतावाद्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यास मिळणार नाही. 


८ जुलै २०१६ ला भारतीय सुरक्षा दलानं बुरहानी वानीला कंठस्नान घातले होते. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक महिने हिंसाचार उफाळला होता.