नवी दिल्ली :  जर रावणाच्या लंकेत बुरख्यावर बंदी येऊ शकते तर रामाच्या अयोध्येत का नाही ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेच्या या मागणीवर जोरदार टीका केली. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला आपली आवड जोपासण्याचा अधिकार असल्याचे एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या अज्ञान लोकांना मी सांगू इच्छितो की आवड जोपासणे प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. पण सामनातील अग्रलेख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय असा प्रहार ओवेसींनी केला.


अधिकृत भूमिका नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर देशभरात बुरखा प्रकरणावर चर्चा झाली. पण सामनातील अग्रलेख ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे सेना प्रवक्ता निलम गोऱ्हे यांनी म्हटले. शिवसेनेची भूमिका ही पार्टी नेत्यांच्या बैठकीत ठरते. ज्यावर पार्टी अध्यक्ष आपला निर्णय ठरवतात. सामनातील अग्रलेखावर पार्टी मिटींगमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही किंवा उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात कोणता निर्णय दिला नाही.


काँलेजमध्ये बंदी 


देशभरात सध्या बुरखा बंदीवरून वाद सुरू असताना केरळच्या एका मुस्लिम काँलेजमध्ये आजपासून बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थीनींनी काँलेजमध्ये बुरखा न घालून येण्याचे आदेश काँलेज प्रशासनाने दिले आहेत. मल्लापुरमच्या एका अल्पसंख्यांक काँलेजमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.



हा अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर 'शिवसेने'च्या या भूमिकेवर आरपीआय आणि मुस्लिम धर्मगुरूंनी टीका केली. शिवसेनेच्या या मागणीवर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार आक्षेप घेतला. महिला कोणतेही कपडे परिधान करू शकतात, मग बुरखा का नाही? असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर आचार संहितेचं उल्लंघन करण्याचा आरोप केला. सोबतच, 'हिंदू महिलांच्या पडदा पद्धतीवरही बंदी आणणार का?' असाही सवाल त्यांनी विचारला.