Bus Blast New : जम्मू-काश्मीरमध्ये  (Jammu Kashmir) पेट्रोल पंपावरच प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट झाला आहे.  (Jammu Kashmir Bus Blast) ही घटना उधमपूरमध्ये घडली. हा स्फोट एवढा जबरदस्त होता शेजारी उभे असलेले दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे काश्मिरमध्ये आठ तासांत दुसरा स्फोट झाला. दरम्यान, लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल झाले आहे. तसेच अधिकारी आणि श्वान पथक, जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील बसस्थानकावर पोहोचले आहेत. ज्याठिकाणी दुसरा स्फोट झाला, तेथे हे पथक दाखल झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशिरा डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवासी बसमध्ये स्फोट झाला. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा बसमध्ये प्रवासी नव्हते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटामुळे पेट्रोल पंपाचं कोणतंही नुकसान झालेले नाही, त्यामुळे मोठा टळला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.  (Jammu Kashmir Bus Blast Viral Video)



जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असताना मागच्या आठ तासांत दुसरा स्फोट झाल्याने मोठा हादरा बसला आहे. उदमपूर येथे पार्किंगमध्ये लावलेल्या ट्रॅव्हल बसमध्ये हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास काश्मिरातील डोमाईल चौकात बसमध्ये असाच एक स्फोट झाला असून त्यात दोघे जण जखमी झाले.  तर दुसरा स्फोट आज पहाटे झाला असून पहिल्या घटनास्थळापासून फक्त 4 किमी अंतरावर झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि सुरक्षा जवान सतर्क झाले आहेत.