नैनिताल: पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, अपघात किंवा महापुराचं संकट ओढवलं आहे. उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सध्या भूस्खलन, दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. नुकताच नेपाळजवळ दरड कोसळून एक मोठी दुर्घटना होता होता टळली. ही घटना ताजी असतानाच आता सोशल मीडियावर थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

 

बसमधून जात असताना अचानक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बस सापडण्याआधीच थांबली. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी या दुर्घटनेतून वाचले खरे. मृत्यू समोर दिसत असताना सर्व प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी बसमधून उतरून रस्त्यावरून पळत सुटले. कोणी दरवाज्यातून तर कोणी खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून किती भीषण परिस्थिती असेल याची कल्पना येईल. 


मिळालेल्या माहितीनुसार नैनीताल जिल्ह्यातील ज्योतीकोट-भवाली हायवेवर ही मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरात भूस्खलन झालं. त्याच वेळी रस्त्यावरून प्रवाशांनी भरलेली बस जात होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवासी या दुर्घटनेतून वाचले आहेत. बस चालकानं दाखवलेल्या