Byju's Financial Crisis: काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या  Byju कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत कंपनीच्या कामकाजासाठी 600-700 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याच्या प्रयत्नात आहे.  कंपनीचे संस्थापक बीजू रवींद्रन (Byju Raveendran) यांनी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची घरं आणि स्थावर मालमत्ता गहाण ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थावर मालमत्ता गहाण
बायजूला मार्च 2023 पर्यंत इतर उपकंपन्यांमधील भागभांडवलांच्या आंशिक विक्रीतून निधी उभारण्याची अपेक्षा आहे.  कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आहे. यात मोठा भाग हा कर्मचाऱ्यांचा पगाराचा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी Byju's च्या मालकांनी कुटुंबातील सदस्यांचे शेअर्स, घरं आणि इतर काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडमधील सुमारे 15,000 कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी हा पैसा वापरला जात असल्याचंह सूत्रांनी सांगितलं.


करोडोचं कर्ज घेण्याच्या तयारीत
कंपनीची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी संस्थापक बीजू रवींद्रन हे  600-700 कोटी रुपय कर्ज घेण्याच्या  तयारीत आहेत. 2024 मध्ये कंपनीचे काही भागभांडवल विकून तो पैसा कंपनीत गुंतवणार आहेत. ज्यामुळे आर्थिक स्थिती सावरेल अशी रवींद्रन यांना आशा आहे. 20 डिसेंबरला कंपनीने वार्षिक बैठक बोलावली आहे. 


या बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षाच्या आर्थिक निकालांबाबतही भागधारकांशी चर्चा केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी 160 कोटी रुपयांच्या प्रायोजकत्व देय रकमेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नव्याने री-पेमेंट शेड्यूल करण्याच्या प्रक्रियेत आहे. याशिवाय विद्यमान गुंतवणूकदारांनीही नवीन फंड गुंतवण्याची कंपनीला अपेक्षा आहे. बायजूकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


बायजूवर ही वेळ का आली?
आपल्या प्रगतीच्या काळात बायजूने टीम इंडियाला स्पॉन्सर केलं होतं. पण बीसीसीआय आणि बायजूमध्ये आर्थिक वाद झाला आणि बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीवरुन आपलं नाव काढून घेतलं. हा वाद नेशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये सुरु आहे.