मुंबई : कोरोना संसर्गामुळे अर्थकारणाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने, निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत गतीने सुधारणा होत आहेत. देशातील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हायरिंग (Fresh Hiring) सुरू झाली झाली आहे. यामध्ये देशातील नोकऱ्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थव्यवस्थेत सुधारणा
रिक्रुटमेंट फर्म मायकल पेज इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2021 च्या तिसऱ्या तिमाहीच्या प्रमाणात नवीन नोकऱ्यांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीव नियुक्त्यांमध्ये इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सर्वात जास्त भरती झाली आहे. तसेच टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये जॉबच्या संधी वाढल्या आहेत.


नोकरीच्या संधी वाढल्या
मायकल पेज इंडियाच्या प्रबंध निर्देशक निकोलस डुमौलिन (MD Nicolas Dumoulin)यांनी म्हटले की, सप्टेंबर तिमाहीमध्ये देशात जॉबच्या संधीमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोकऱ्यांच्या संधीमध्ये 50 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.


टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 58 टक्क्यांनी जॉबच्या संधी वाढल्या
इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये नवीन नोकऱ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.