मुंबई : बिझनेस करायचाय पण समजत नाहीये की नेमका कोणता करावा? असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला एका अशा बिझनेस बद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मालामाल व्हाल. तो बिझनेस म्हणजे अमूल कंपनी फ्रेंचाइजी घेणे. ही फ्रेंचाइजी तुम्हाला महिन्याला 10 लाख रुपये मिळवून देऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमूल फ्रेंचाइजीने (Amul Franchise) दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंचाइजीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला साधारणत: 5 ते 10 लाख उत्पादनांची विक्री होऊ शकते. अमूल आउटलेट घेतल्यानंतर, कंपनी अमूल प्रोडक्टच्या किमान विक्री किंमतीवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के,  दुधाच्या पदार्धांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.


अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची (Amul Ice Cream Scooping Parlour) फ्रेंचाइजी घेतल्यावर रेसिपी बेस्‍ड आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते.


कशी घ्याल Amul Franchising ?


तुम्हाला अमूल आउटलेटची फ्रेंचाइजी (Amul Franchising) घ्यायची असेल तर तुमच्याकडे फक्त 150 स्वेअर फूट जागा असायला हवी. तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर अमूल कंपनी तुम्हाला फ्रँचायझी देईल. पण, अमूल आइस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी किमान 300 स्केअर फूट जागा असावी. तुमच्याकडे तेवढी जागा नसेल तर अमूल फ्रेंचाइजी मिळणार नाही.


किती रुपयांची गुंतवणूक आवश्यक?


तुम्हाला अमूलस फ्रेंचाइजी (Amul Franchise) घ्यायची असेल तर तुम्हाल यासाठी साधारण: 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यासोबतच, तुम्हाला ब्रँड फ्रेंचाइजी म्हणून 50,000 रुपये, रिनोवेशनसाठी 4 लाख रुपये, इक्‍वीपमेंटसाठी 1.50 लाख रुपये खर्च करावे लागतील.


जर तुम्हाला अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रेंचाइजी (Amul Franchise) घ्यायची असेल तर तुम्हाला त्यात साधारण: 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये 25 हजार रुपये हे नॉन-रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी, 1 लाख रुपये रिनोवेशनसाठी, 75 हजार रुपये इक्‍वीपमेंटवर खर्च केले जातात. याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही अमूल कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइट किंवा फ्रेंचाइजी पेजला भेट देऊ शकता.