How to Start Pickle Business at Home: आपल्याला सर्वांनाच आयुष्यात काहीतरी वेगळं (Easy Business Ideas)करण्याची इच्छा असते. त्यामुळे आपण कोणतातरी लहानसहान बिझनेस (Small Business Idea) तरी सुरू करूया असा विचार करत असतो. परंतु बिझनेसमधून तरी किती फायदा होईल असा प्रश्न आपल्यालाही सतावतो? शेवटी पैसा उभा करायचा कसा? प्रोफीट (How to Start Pickle Business) आणायचे कुठून असा प्रश्नही आपल्यालाही पडायला लागतो. त्यामुळे बिझनेस करण्याचा सोप्पा मार्ग आहे तो म्हणजे छोटासा घरगुती बिझनेस करणे. (Business Ideas how to start pickle business at home know the strategy at first trending news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा बिझनेसमधून आपल्याला चांगला फायदा होतो आणि आपला वेळही वाचतो. आजकाल अशी अनेक लोकं आहे जी मल्टिटास्किंग (Multitasking) करत आहेत. आपला रोजगार सांभाळता सांभाळता तेही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी बिझनेस आयडियाज शोधतात. 


सध्या अशीच एक बिझनेस आयडिया तुमच्या कामी येऊ शकते आणि ती म्हणजे घरच्या घरी लोणची बनवायची आणि विकायची. यातून तुम्हाला चांगला प्रोफीट (Profit Making Business) मिळू शकतो. तेव्हा जाणून घेऊया या भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल. आपल्या सगळ्यांनाच आंबटगोड लोणची खायला आवडतात. त्यामुळे आपल्यालाही कायमच असा प्रश्न पडतो की याचा आपणच बिझनेस का नाही करू शकत? ऐन पंगतीत आपल्या आप्तांंबरोबर नाहीतर आपल्या मित्रपरिवारासोबत जेवायला तुम्ही बसेल असाल तर तुम्ही असे शब्द अनेकांच्या तोंडून हे ऐकलेच असतील. तुम्हालाही जर का असा प्रश्न पडत असेल तर तुम्हीही यशस्वीरीत्या हा बिझनेस करू शकता. 


कशी बनवाल पहिली स्ट्रेटेजी - 


कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी (Market Research) तुम्हाला तुमचा रिसर्च चांगला करावा लागतो. त्यानंतर त्या बिझनेससाठी तुम्ही विकणाऱ्या प्रोडक्टची रेंज (Product Range) समजून घ्यावी लागते. आजकाल हरतऱ्हेच्या फळांपासून आणि पदार्थांपासून लोणची तयार केली जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांना कोणते पदार्थ देणार आहात आणि ते कोणते विकत घेणार आहेत याचा तुम्हाला पुर्ण अंदाज असणे आवश्यक असायला हवे. जरी तुम्ही घरच्या घरी बिझनेस करणार असाल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. 


सध्याचा मौसम गर्मीचा आहे. तेव्हा अशावेळी आंब्यांच्या प्रोडक्ट्सना मोठी डिमांड (Mangoes Demand) असते. त्यामुळे घरच्या घरी लोणची बनवण्याचे कामही एव्हाना सुरू झालेले असते. तेव्हा याचा फायदा घेत तुम्ही अशावेळी घरगुती लोणच्यांचा बिझनेस सुरू करू शकता. याला चांगली सुरूवात मिळावी म्हणून तुम्ही सोशल मीडियाचा चांगला उपयोग करून घेऊ शकता.


  • तुमच्याकडे जरा का 10 हजार रूपये असतील तर तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही योग्य मार्केटिंग, रिचर्स आणि प्रोफिट मेकिंगचे गणित आजमावलेत तर तुम्हाला चांगला प्रोफिट होऊ शकतो. परंतु यातून तुम्हाला जास्तीत जास्त 50 हजारांपर्यंत फायदा होऊ शकतो. 

  • यासाठी तुम्हाला फंडही मिळेल. बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला स्टोअरही लागेल. 

  • हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला FSSAI चे लायसेन्स असणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरू शकता. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)