अनेकांनाच धक्का; अंबानींच्या `या` कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....
Business news : भारतीय उद्योग जगतातून मोठी माहिती समोर. अंबानींचं नाव पुढे. नेमकं घडलंय काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि व्यवहारासंदर्भातील माहिती...
Business news : भारतीय उद्योग जगतामध्ये सातत्यानं नवे बदल होत असतानाच एक नवी माहिती समोर आली आहे. यामध्ये एका अशा कराराची चर्चा सुरू आहे, ज्यासंदर्भातील माहिती मिळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निमित्त ठरतंय ते म्हणजे या व्यवहारामध्ये खर्ची घालण्यात आलेली रक्कम आणि त्यानंतरच्या घडामोडी.
एकिकडे अंबानी समुहाला विविध क्षेत्रांमध्ये उंचीवर नेणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं व्यवसाय क्षेत्राच्या नजरा वळवलेल्या असतानाच त्यांचे बंधू अनिल अंबानी मात्र वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरले. सातत्यानं मिळणारं अपयश, आर्थिक डबघाई, ही त्यामागची काही महत्त्वाची कारणं. आता याच अनिल अंबानींच्या हातून आणखी एक कंपनी गेल्याचं म्हटलं जात आहे.
कर्जामुळं संकटात असणारी अनिल अंबानी यांची ही कंपनी त्यांनी गमावली असून, रिलायन्स कॅपिटलचाच भाग असणाऱ्या या कंपनीसाठी सर्वाधिक बोली लावली ती म्हणजे हिंदूजा समुहाशी संलग्न असणाऱ्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स (IIHL) या कंपनीनं. NCLT च्या आदेशांनंतर या कंपनीनं 2750 रुपये एस्क्रो अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले असून, अंतिम तारखेपूर्वीच हा संपूर्ण व्यवहार करण्यात आला. सदर व्यवहारानंतर या कंपनीकडून बँकांची एक बाईंडिंग शिटही जमा करण्यात आली असून, यामध्ये व्यवहाराच्या अनुषंगानं बँकांच्या कर्जाचीही माहिती दिली आहे.
अनिल अंबानींच्या या कंपनीची किंमत काय?
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलची भागिदारी खरेदी करण्यासाठी IIHL नं सर्वात मोठी बोली लावली असून, डिसेंबर 2022 मध्ये ही बोली लावण्यात आली होती. ही बोली 9861 कोटी रुपयांसाठी लावण्यात आली असून, इतकी मोठी रक्कम देण्यासाठी हिंदूजा समुहातील या कंपनीचं कंबरडं मोडताना दिसत होतं.
हेसुद्धा पाहा : हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती?
स्वस्त दरात कर्ज खरेदी करण्यासाठी म्हणून या समुहानं अनेक बँकांकडे विचारणा केली होती. पण, त्यांच्या हाती निराशाच लागली. आताच्या घडीला ही कंपनी एकूण रकमेपैकी 7300 कोटी रुपये जमवू शकली असून, इथून पुढील रकमेची जमवाजमव करण्यासाठी आता नव्यानं आखणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार बँकांनी हिंदूजा समुहाला कर्जासंदर्भात मदत न केल्यास आता हा समुह बाँडच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्यावर भर देऊ शकतो.
मूळ कंपनीवर 40,000 कोटींचं कर्ज
अनिल अंबानी यांची मालकी असणाऱ्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीवर एकदोन नव्हे, तर तब्बल 40000 कोटी रुपयांचं कर्ज असून, ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. कधी एकेकाळी अनिल अंबानी यांची हीच कंपनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एर होती. लाइफ इंश्योरंस, जनरल इंश्योरंस, हेल्थ इंश्योरंस याशिवाय होमलोन, कमर्शियल लोन, इक्विटी, ब्रोकिंग यांसारख्या सुविधा पुरवण्यासाठी ही कंपनी ओळखली जात होती. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर 2700 रुपयांवर होते. पण, कर्जामुळं या कंपनीचे वाईट दिवस सुरू झाले आणि या शेअरची किंमत 11.90 रुपयांवर पोहोचली. पुढे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या या कंपनीची अवस्था पाहता त्यातील शेअर ट्रेडिंग पूर्णपणे थांबवण्यात आलं.