हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती?

Anil Ambani neighbour : असे हे अनिल अंबानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले आहेत. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे नवे शेजारी. 

Aug 08, 2024, 11:14 AM IST

अंबानी कुटुंबाची गणती देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब म्हणून केली जाते. फक्त मुकेश अंबानीच नव्हे, तर अनिल अंबानी यांच्या नावाची चर्चासुद्धा भारतीय उद्योग जगतामध्ये पाहायला मिळते. 

1/7

मुंबई

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

मुंबई शहरानं आजवर अनेकांनाच आसरा दिला आहे. कलाकार, उद्योजक आणि अगदी सामान्य जनता... सर्वांना आपलंसं करून घेणाऱ्या याच शहराला व्यापारानं नवं रुप दिलं आहे. अशा या शहरात मागील कैक वर्षांपासून आपल्या उद्योगाच्या बळावर नावाजलेल्या अंबानी कुटुंबाला आता नवे शेजारी भेटले आहेत.   

2/7

500 कोटी रुपयांचा बंगला

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

मुकेश अंबानी यांचे बंधू, अनिल अंबानी यांच्या शेजारी एक प्रचंड धनाढ्य कुटुंब वास्तव्यास आलं असून, या कुटुंबानं मुंबई शहरात 500 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. शहराच्या अतिशय उच्चभ्रू अशा कफ परेड भागामध्ये त्यांनी हा बंगला खरेदी केला असून, या श्रीमंत कुटुंबाचं नाव आहे पूनावाला. 

3/7

योहान पूनावाला

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

पूनावाला इंजिनिअरिंग ग्रुपचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यावसायिक योहान पूनावाला आणि त्यांची पत्नी मिशेल पूनावाला यांनी हा बंगला खरेदी केला असून, दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू 30,000 चौरस फुटांच्या भूखंडावर स्थित आहे. 

4/7

अनिल अंबानींचं घर

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

अनिल अंबानी यांचंही घर याच भागात असून, Sea Wind असं त्यांच्या घराचं नाव. हल्लीच त्यांनी त्यांच्या Abode या घरी वास्तव्यास सुरुवात केली. मुंबईतील हा तोच परिसर आहे जिथं अनेक बडे व्यावसायिक वास्तव्यास आहेत. दरम्यान पूनावाला यांच्याकडून मात्र त्यांच्या या संपत्तीच्या खरेदीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. पण, शहराच्या रिअल इस्टेटची सद्यस्थिती पाहता पूनावाला यांनी खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत 500 कोटी असल्याचा तर्क लावला जात आहे. 

5/7

अदार पूनावाला यांच्याशी नातं

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला हे योहान पूनावाला यांचे चुलत बंधू. सध्या योहान आणि त्यांची पत्नी मिशेल पुण्यातील पूनावाला हाऊस इथं वास्तव्यास असून, मुंबईतील हे घर त्यांचं सेकंड होम असेल असं सांगितलं जात आहे. 

6/7

पूनावाला फायनॅन्शिअल्स

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

योहान यांची पत्नी, मिशेल पूनावाला MYP Design Studio नावाच्या एका इंटिरिअर डिझायनिंग स्टुडिओच्या सर्वेसर्वा आहेत. तर, 52 वर्षीय योहान पूनावाला El-O-Matic India चे मालक आहेत याशिवाय ते सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे शेअरहोल्डर आणि पूनावाला फायनॅन्शिअल्सचे अध्यक्षही आहेत. 

7/7

लक्झरी आणि विंटेज कारची आवड

anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth

भारतातील श्रीमंत कुटुंबांच्या यादीत योहान पूनावाला यांचंही नाव घेतलं जातं. लक्झरी आणि विंटेज कारची त्यांना आवड असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची रॉयल हाऊसहोल्ड कारही त्यांनी खरेदी केली होती.