Mukesh Ambani Business : व्यवसाय क्षेत्रात दर दिवशी इतक्या घडामोडी घडत असतात की, पाहणारेही थक्कच होतात. असंच काहीचं सध्या रिलायन्सचीच एक फळी असणाऱ्या जिओ हॉटस्टारसमवेत घडताना दिसत आहे. दिल्लीच्या एका अॅप डेवलपरनं JioHotstar नावाचं डोमेन खरेदी केलं होतं. ज्यानंतर त्यानं रिलायन्स आणि संलग्न कंपनीला त्याच्या महाविद्यालयाची फी भरण्यास सांगितलं. याच डेवलपरनं आता हे डोमेन दुबईतील दोन लहान मुलांना विकलं. जैनम आणि जिवीका अशी त्या दोघांची नावं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

JioHotstar च्या संकेतस्थळावरच या मुलांनी त्याबाबतची माहिती दिली. या दोघांनी लिहिलं, आम्ही वयानं लहान असलो तरीही सकारात्मकतेचा मुद्दा येतो तेव्हा आम्हाला वयाचा आकडा महत्त्वाचा वाटत नाही. भारतामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान आलेल्या या मुलांनी जे पैसे कमवले त्या पैशांनी त्यांनी अॅप डेवलपरकडून JioHotstar चं डोमेन खरेदी केलं. 


आपण भारतामध्ये साधारण 50 दिवस होते असं सांगताना आपण हा देश फिरलो आणि परतत असताना दिल्लीतील एका युवा डेवलपरकडून हे डोमेन खरेदी केलं आणि त्याला मदत केली. इतकंच नव्हे, तर आपण हे डोमेन रिलायन्सला अगदी मोफतही देऊ, पण त्यासाठी त्यांनी आपल्याला मेल करणं अपेक्षित आहे अशीही अट या मुलांनी पुढे केली. इथंच गणितं फिस्कटली आणि जिओनं जिओस्टार नावाचं डोमेन तयार करत कंपनी ते येत्या काळात लाईव्हही करणार आहे. 


हेसुद्धा वाचा : मुंबईत तब्बल 1585100000 कोटी रुपयांना सी व्ह्यू फ्लॅटची विक्री; हा ठरला शहरातील सर्वात महागडा सौदा! 


राहिला मुद्दा थेट मुकेश अंबानी यांनाच फ्री डोमेनची ऑफर देणारी ही लहान मुलं आहेत तरी कोण, यासंदर्भातला तर जैनम आणि जिविका युट्यूबवर बरेच लोकप्रिय आहेत. 2017 मध्ये त्यांनी YouTube चॅनल सुरू केला होता. सुरुवातीला या चॅनलवर त्यांच्या खेळण्यांनी खेळताना दिसत, मित्रमंडळींसोबत कल्ला करताना दिसत. पण, त्यानंतर मात्र त्यांनी आपल्य़ा चॅनलवर विज्ञान आणि तत्सम विषयांवरील व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. येत्या काळात ही दोन कमाल प्रसिद्ध मुलं लोकप्रिय व्यक्तींशी संवाद साधत एक पॉडकास्ट शो त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणणार असल्याचं सांगितलं जात आहे.